शिवसैनिकांनापासून आपल्या जीवितास धोका: किरीट सोमय्या


मुंबई: भाजप नेत किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसैनिकांपासून आपल्या जीवितास धोका असल्यामुळे सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असा खबळजनक दावा केला. त्यांनी याबाबत राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठवले आहे.

आत्तापर्यंत अनेक घोटाळे मी उघडकीस आणले आहेत. अनेक प्रकरणे उघड केली आहेत. पण, कधी मला भीती वाटली नाही. शिवसेनेचे लोक दोन वर्षांपूर्वी हल्ला करण्यासाठी आले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. काही धमक्या आत्ताही येत आहेत. जगासमोर शिवसेनेची ही गुंडगिरी यावी यासाठी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठविले असल्याचे सोमय्या यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.

भाजप आणि शिवसेनेत सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर चांगलीच जुंपली होती. भाजपवर शिवसेनेकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. शिवसेनेच्या या तोफखान्याला उत्तर देण्यासाठी भाजपकडून किरीट सोमय्या मैदानात उतरले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी उघडकीस आणली होती.

शिवसेनेचे नेते आणि सोमय्या यांच्यात त्यावरून वादही झाले. शिवसेनेने त्याचा राग असल्याने सोमय्यांना तिकीट देऊ नका, अशी मागणी केल्यानंतर सोमय्यांचे तिकीट कापण्यात आले होते.

Leave a Comment