आता क्यूआर कोडच्या मदतीने काढता येणार ताजमहालचे प्रवेश तिकिट

(Source)

दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येत असतात. आता ताजमहालमध्ये प्रवेशासाठी तिकिटासाठी पर्यटकांना रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ताजमहालसाठी ऑनलाईन तिकिट प्रक्रिया अधिक सोपी केली आहे.

क्यूआर कोड जारी करण्यात आला असून, याच्या माध्यमातून पर्यटक तिकिट खरेदी करू शकतात. ताजमहालवर मॅग्नेटिक काइनची सुविधा आहे.

पर्यटक क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलमध्ये प्रवेश तिकिट डाउनलोड करू शकतात. यामुळे त्यांना तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. क्यूआर कोड ताजमहालाच्या प्रवेश गेटवर लावण्यात आलेले आहे. हॉटेल आणि टूर अँन्ड ट्रॅव्हल कंपन्यांच्या ऑफिसमध्ये देखील हे कोड उपलब्ध करण्यात आले आहेत.

या नवीन सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. ताजमहालच्या पुर्व आणि पश्चिमेकडील गेटवर अनेक ठिकाणी स्कॅन आणि पेमेंट नावाचे क्यूआर कोड लावण्यात आलेले आहेत.

या क्यूआर कोडद्वारे पर्यटक अगदी मिनिटामध्ये तिकिट बूक करू शकतात. पर्यटकांनी मोबाईल फोनद्वारे क्यूआर कोड स्कॅन करताच त्यासंबंधित लिंक थेट ऑनलाईन तिकिट बुकिंग सिस्टमशी जोडेल. या प्रक्रियेमुळे पर्यटकांची वेळ वाचेल.

Leave a Comment