सलमान खानने ‘हुड हुड दबंग’ गाण्यातून वगळली वादग्रस्त दृष्ये


हिंदू साधुंना नाचताना दबंग 3′ या चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यात दाखवण्यात आले होते. पण ही दृष्ये आता या गाण्यात दिसणार नाहीत. 18 डिसेंबर रोजी आपल्या ट्विटर हँडलवरून एका ट्विटद्वारे सलमान खान प्रॉडक्शनने ही माहिती दिली आहे. 20 डिसेंबर रोजी ‘दबंग 3’ हा चित्रपट रिलीज होणार असून रिलीजच्या अवघ्या 2 दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे.


सलमान खान फिल्म्सने ट्विट केले आहे, प्रत्येकाच्या भावना लक्षात घेऊन ‘हुड हुड दबंग’ गाण्यातील काही दृश्य आम्ही स्वेच्छेने हटवत आहोत’. प्रभुदेवाने ‘दबंग 3’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, किचा सुदीप आणि प्रमोद खन्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

नोव्हेंबरमध्ये साधूच्या रूपात चित्रपटाच्या शीर्षक गाण्यात नाचणार्‍या कलाकारांविरोधात हिंदु जनजागृती समितीने आक्षेप नोंदविला होता. या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनावर समितीचे महाराष्ट्र आणि झारखंडचे संयोजक सुनील घनवट यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले होते की, सलमान खानसोबत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पद्धतीने या गाण्यात साधू नाचत असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सुनील म्हणाले होते, सलमानने ज्याप्रकारे साधूंना नाचताना दाखवले त्याप्रकारे तो मुल्ला-मौलवी किंवा फादर यांना असे नाचताना दाखवण्याची हिम्मत करेल का? शूटिंग दरम्यान महेश्वरमधील शिवलिंगांच्या आवरणावरून वादही झाला होता.

Leave a Comment