PPF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले


नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF मधून पैसे काढण्याच्या नियमांत सरकारने बदल केले असून पीपीएफ योजना 2019 मधील बदल केंद्र सरकारने जाहिर केले आहेत. दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर PPF मध्ये 80 C नुसार करात सवलत मिळते. या व्याजावरही कर भरावा लागत नाही. बहुतांश लोक या सगळ्या फायद्यांमुळेच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडतात.

PPF अकाउंट मुदतीआधी बंद करण्याच्या नियमांत 2019 मध्ये बदल झाले. PPF खाते नव्या नियमांनुसार 5 आर्थिक वर्षं पूर्ण झाल्यानंतर वेळेआधी बंद करण्याची परवानगी आहे. सरकारने याआधी गंभीर आजारांवरच्या उपचारासाठी PPF खाते बंद करण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर उच्चशिक्षणासाठीही ही सोय होती. वेळेआधी PPF खाते बंद केले तर व्याजदरापेक्षा 1 टक्का कमी व्याज मिळेल. नव्या नियमांनुसार खातेधारकांचे कर्ज वसूल करायचे असेल तर त्यांच्या PPF खात्यातून ती रक्कम वसूल करता येत नाही. या नियमांनुसार आता PPFमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

Leave a Comment