शेकडो वर्ष जुन्या ऑलिम्पिक जाहीरनाम्यासाठी लागली तब्बल 62 कोटींची बोली

(Source)

आधुनिक ऑलिम्पिकचे जनक पियरे डी कूबरटिन यांनी 1892 मध्ये लिहिलेल्या जाहीरनाम्यासाठी लिलावात कोट्यावधींची बोली लागली. 14 पानांच्या या जाहीरनाम्यासाठी तब्बल 62.40 कोटी रुपयांची बोली लागली. हा लिलाव न्यूयॉर्कच्या सोदबी ऑक्शन हाउस येथे पार पडला. या आधी जून 2019 मध्ये बेसबॉल लेजेंड बेब रूथ यांच्या जर्सीचा 39.70 कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला होता.

सोदबीनुसार, लिलाव सुरू झाल्यानंतर अवघ्या 12 मिनिटात जाहीरनाम्याची विक्री झाली. अंदाजीत रक्कमेपेक्षा 9 पट अधिक बोली लागली. त्यांना जाहीरनाम्यासाठी 7 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज होता.

ऑक्शनर सेल्बी किफेर म्हणाले की, फ्रांसच्या कूबरटिन यांनी खेळाडूंना सामाजिक आणि वैयक्तिगतरित्या फायद्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी 1894 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली होती. त्यानंतर 1896 मध्ये इंथेस येथे आधुनिक ऑलिम्पिक गेम्स खेळले गेले.

Leave a Comment