आता मराठी पाहायला मिळणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ओळखली जाते. ही मालिका तब्बल 10 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीने हा शो सोडल्यामुळे, हा शो सध्या चर्चेत आहे. पण आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आता मराठी देखील पाहता येणार आहे. ‘गोकुलधामची दुनियादारी’ या नावाने ‘फक्त मराठी’ वाहिनीवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेचा मराठी प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.


मुळ मालिकेचे ‘गोकुलधामची दुनियादारी’ हे डब व्हर्जन असणार आहे. 24 डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार रोज रात्री 9 वा. या मालिकेचे प्रसारण होणार आहे. ‘गोकुळधाम सोसायटी’ ही 4 विंग असलेली, गोरेगाव पूर्व, मुंबईच्या पावडर गल्लीतील एक काल्पनिक निवासी संस्था आहे. हा शो मुख्यत: इथे राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरत राहतो. जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, भिडे मास्तर, डॉ. हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकर पोपटलाल आणि टप्पू सेना अशा भूमिका या मालिकेमुळे लोकप्रिय ठरल्या आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका 28 जुलै 2008 पासून सुरु झाली. या मालिकेचे आतापर्यंत 2800 हून अधिक भाग प्रसारित झाल्यामुळे हा जगातील सर्वाधिक जास्त काळ चालणारी कॉमेडी मालिका बनली आहे. आता ही मालिका मराठीमध्ये येत असल्याने ‘तारक मेहता…’ च्या मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

Leave a Comment