केवळ फोटो काढण्यासाठी ही व्यक्ती देत आहे महिन्याला 22 लाख रुपये पगार

(Source)

जर तुम्हाला जगप्रवास करण्यासाठी व चांगले फोटो काढण्यासाठी महिन्याला 22 लाख रुपये पगार देत असेल तर ? तुम्ही एक क्षणाचाही विचार न करता या कामाला नक्की हो म्हणाल.

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू लेप्रे या कोट्याधीशाने आपल्या खाजगी फोटोग्राफर पदासाठी एक जाहिरात दिली आहे. या नोकरीत उमेदवाराला त्याच्याबरोबर जगप्रवास करण्याची संधी देखील मिळेल.

लेप्रे eCom Warrior Academy चा संस्थापक आहे. या कामासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तीला फोटो काढावे लागतील व ते सोशल मीडियावर पोस्ट करावे लागतील. या कामासाठी महिन्याला 28 हजार युरो (22 लाख रुपये) पगार देखील मिळेल.

एवढेच नाही तर ज्या व्यक्तीला ही नोकरी मिळेल, त्याच्या जगप्रवासाचा खर्च देखील लेप्रे स्वतः करणार आहे. त्याने सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून तो एकटाच व्यवसाय सांभाळत आहे. त्याचे फोटो मित्र काढतात. मात्र आता त्याला पर्सनल फोटोग्राफरची गरज आहे. या कामाता खाणे-पिणे, फिरणे सर्व मोफत आहे. वेळेचे देखील काहीही बंधन नाही.

Leave a Comment