लवकरच बाजारात येणार ‘मॅगी सँडल’, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

 

(Source)

अवघ्या 2 मिनिटात तयार होणारी मॅगी तर सगळ्यांनाच आवडते. मात्र आता या मॅगीसारखे दिसणारे हिल्सचे सँडल लवकरच बाजारात पाहायला मिळणार आहे. 2020 च्या प्री-फॉल कलेक्शन अंतर्गत इटलीचा ब्रँड बौटेगो वेनेटाने हे खास सँडल तयार केले आहेत.

इंस्टाग्राम अकाउंट डाइट प्राडावरून या मॅगीवाल्या सँडलचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. पुढील वर्षी हे सँडल बाजारात उपलब्ध होतील.

सध्या सोशल मीडियावर या मॅगी हिल्स सँडलचे फोटो व्हायरल होत असून, युजर्स यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. या पोस्टला आतापर्यंत 85 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

https://www.instagram.com/p/B6LLKBtA6zN/?utm_source=ig_web_copy_link

छोटे मॅगीचे पाकिट अगदी 10 रुपयांना मिळत असेल. मात्र या सँडलची किंमत हजोरांच्या घरात आहे. या खास मॅगी सँडलची किंमत 70 ते 95 हजार रुपयांच्या मध्ये आहे.

Leave a Comment