या जोडप्याने बनवलेल्या स्वेटरवर पडत नाहीत कोणत्याच प्रकारचे डाग

(Source)

थंडीत बेघर लोकांना मदत करण्यासाठी लंडन येथील उद्योजक वरून भनोट आणि त्यांची पत्नी अनीशा सेठ असे कपडे तयार करत आहेत, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग लागत नाही व ते खराब होत नाहीत. हुडी (टोपी असलेले स्वेटर) बनवून ते गरीब लोकांना मोफतमध्ये देत आहेत. या कपड्यावर वाइन, कॉफी, चहा, सूप सारख्या कोणत्याही वस्तूंचा डाग पडत नाही. जर गडद पदार्थ पडला तर पाण्याने तो डाग लगेच निघून जातो. या कपड्याचा जगातील पहिले ‘सेल्फ-क्लिनिंग हुडी’ म्हणून प्रचार केला जात आहे.

29 वर्षीय वरूण लंडनमध्ये उद्योजक आहेत व चॅरिटी अनहॉउस्ड.ओआरजीचे सह-संस्थापक आहेत. ते या संस्थेच्या माध्यमातून बेघर लोकांना मदत करतात. त्यांनी सांगितले की, हे कपडे तयार करण्यासाठी नॅनोस्कोपिक पॉलिएस्टर फायबरचा वापर करण्यात आलेला आहे. हे कापड कमळाच्या पानांप्रमाणे असते. याच कारणामुळे यावर कोणत्याही तरळ पदार्थाचा परिणाम होत नाही. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 1 लाख गरीब लोकांना हुडी दिले आहेत.

अनीशाने सांगितले की, या हुडीमध्ये वापरण्यात आलेल्या मटेरियलला बनवण्यासाठी त्यांना 1 वर्ष लागली. याचे मटेरियल असे आहे की, कापड 1 महिन्यांपर्यंत न धुवता देखील वापरता येते. याचा वापर जिममध्ये करता येतो. कारण घामाने वास देखील येत नाही. दुसऱ्या कपड्यांच्या तुलनेत ते 40 टक्के अधिक जलद शोषून घेते.

Leave a Comment