फोर्ब्स; देशातील टॉप 100 सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली अव्वल


2019 च्या सेलिब्रिटी 100 ची वार्षिक यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली असून या यादीत आतापर्यंत बॉलिवूड दिग्गजांचा दबदबा होता. पण प्रथमच एखाद्या खेळाडूने फोर्ब्स सेलिब्रिटी 100 च्या यादीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. टॉप 100 सेलिब्रिटींची अंदाजे कमाई आणि प्रिंट-सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या आधारे निवड केली गेली.

क्रिकेटपटू विराट कोहली 252.72 कोटी रुपये वार्षिक कमाईसह अव्वल स्थानावर आहे. त्याची मॅच फी, बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, ब्रँड अ‍ॅन्डोर्समेंट आणि प्रत्येक प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्टवरील 8 अंकी फीचा यात समाविष्ट आहेत. आयसीसीने 2018 मध्ये त्याला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवडले होते.

या यादीत बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने दुसरे स्थान पटकावले. त्याची एकुण कमाई 293.25 कोटी एवढी आहे. अक्षय कुमार 2019 च्या फोर्ब्स यूएस वर्ल्डच्या सर्वाधिक पेड सेलिब्रिटींच्या यादीतील एकमेव भारतीय आहे. यंदा सलमान खानला तिसरा क्रमांक मिळाला असून त्याच्या कमाईचा आकडा 229.25 कोटी एवढा आहे.

टॉप 100 लिस्टमध्ये सेलिब्रिटी शेफ रणवीर बरार आणि विकास खन्ना यांनी प्रथमच स्थान पटकावले. कल्की कोचलीन (93वी रँक) आणि सैफ अली खान (74 वी रँक) यांनीही ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे या यादीत स्थान मिळविले. यावेळची यादी दिव्या जे शेखर, नंदिका त्रिपाठी, नैनी ठाकर, पंक्ती मेहता कडकिया, प्रणित सारडा, सलील पांचाल आणि वर्षा मेघानी यांनी अंतिम केली.

‘झिरो’ या केवळ एका चित्रपटाच्या रिलीजनंतर शाहरूख खानने पहिल्या 10 मध्ये पुन्हा स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची कमाई 27 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 124.38 कोटींवर गेली आहे. पहिल्या दहामध्ये पहिल्यांदा दोन महिलांचा समावेश झाला आहे. आलिया भट आठव्या आणि दीपिका पादुकोण दहाव्या क्रमांकावर आहेत. दिशा पटनी (43 वी रँक), क्रिती सॅनन (38 वी रँक) आणि सारा अली खान ( 66 वी रँक) पहिल्यांदा टॉप 100 यादीत समाविष्ट झाल्या आहेत.

टॉप 10 भारतीय सेलिब्रिटी

  1. विराट कोहली 252.72 कोटी
  2. अक्षय कुमार 293.25 कोटी
  3. सलमान खान 229.25 कोटी
  4. अमिताभ बच्चन 239.25 कोटी
  5. महेंद्र सिंह धोनी 135.93 कोटी
  6. शाहरुख खान 124.38 कोटी
  7. रणवीर सिंह 118.2 कोटी
  8. आलिया भट 59.21 कोटी
  9. सचिन तेंडुलकर 76.96 कोटी
  10. दीपिका पादुकोण 48 कोटी

(1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची या सेलेब्सची कमाईची आकडेवारी आहे.)

Leave a Comment