‘पंगा’मधील कंगनाचा फर्स्ट लूक रिलीज


बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत लवकरच ‘पंगा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘पंगा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. कंगना राणावत या फर्स्ट लूकमध्ये एका वेगळ्या अवतारात आपल्या पाहायला मिळत आहे.


काही दिवसांपूर्वीच ‘पंगा’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर कंगनाची बहीण रंगोली चंदेलने शेअर केले होते. तिने हे फोटो शेअर करताना असे लिहिले, कंगना सांगते की, ती या क्षेत्रात जेव्हा नवीन होती तेव्हा अभिनेत्रींना आईची भूमिका मिळणे हे एक मोठा अपमान मानलं जाते होत. त्यावेळेस तिला या गोष्टीचा त्रास झाला होता. यशस्वी झालेल्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात आईची भूमिका साकारल्यानंतर आता पुन्हा एकदा कंगना आईची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.


‘पंगा’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये कंगना एका सामान्य स्त्रीच्या रुपात दिसत आहे. गुलाबी रंगाचा ड्रेस तिने परिधान केला आहे. तसेच हातात घड्याळ, बांधलेले केस आणि कपाळावर टिकली असल्यामुळे कंगना एका वेगळ्या रुपात दिसत आहे. ती बाल्कनीमध्ये उभी राहून हसताना या पोस्टरमध्ये दिसते आहे.


कंगना राणावत आणि स्वतः सही केलेली कविता ‘पंगा’ या चित्रपटाची दिग्दर्शक अश्विन अय्यर हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. दिग्दर्शक अश्विन अय्यर हिने या कवितेतून ‘पंगा’ या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. २३ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. ‘पंगा’ हा चित्रपट राष्ट्रीय कबड्डीपटूच्या जीवनावर आधारित असणार आहे. रंगोलीच्या पोस्टनुसार या चित्रपटात कंगना आईची भूमिका साकारणार आहे. २४ जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.


कंगना राणावत व्यतिरिक्त या चित्रपटात जस्सी गिल, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि रिचा चड्ढा हे सगळे महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे. तसेच कंगना पंगा व्यतिरिक्त ‘थलइवी’ या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Comment