या देशाने सुरू केला आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा ऑनलाईन मोफत कोर्स

(Source)

फिनलँडने आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल मोफत शिकवण्यासाठी एक क्रॅश कोर्स सुरू केला आहे. या कोर्सचा कालावधी 6 महिन्यांचा असून, हा कोर्स सर्वांसाठी उपलब्ध आहे. एलिमेंट्स ऑफ एआय नावाच्या या कोर्सला फिनलँडच्या नागरिकांना ख्रिसमसची भेट म्हणून सुरू करण्यात आले आहे. या मुळे लोकांना नवीन तंत्रज्ञानाविषयी शिकता येईल.

या कोर्सला कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही. हा कोर्स 5 भाषांमध्ये उपलब्ध असून, यामध्ये इंग्रजी, स्विडीश, फिनिश, इस्टोनियन आणि जर्मन या भाषांचा समावेश आहे.

जर तुम्हाला देखील आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल शिकायचे असेल, माहिती घ्यायची असेल व तुम्हाला या पैकी एकतरी भाषा येत असेल तर तुम्ही देखील या कोर्समध्ये भाग घेऊ शकता. हा कोर्स मोफत असून, सर्वांसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment