10 मिनिटांच्या चार्जिंगवर 480 किमी धावणार इलेक्ट्रिक कार

(Source)

सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी इंफ्रास्ट्रक्चर देखील चांगले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार कंपन्या देखील अनेक इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणत आहेत. मात्र तरी देखील लोक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यापुर्वी अनेकदा विचार करतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे गाडीची बॅटरी आणि त्याचा परफॉर्मेंस आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्लेषक सांगतात की, सध्या कंपन्यांकडे इलेक्ट्रिक व्हिकलचे अधिक पर्याय नाहीत. गाडीमध्ये बॅटरी फास्ट चार्जिंगची सुविधा एवढी फायदेशीर नाही आणि ते लांब प्रवासासाठी देखील पर्याप्त नाही. कारच्या बॅटऱ्या देखील महाग आहेत.

मात्र आता पेन स्टेट युनिवर्सिटीच्या इंजिनिअर्सनी एक बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी 10 मिनिटे चार्ज केल्यावर इलेक्ट्रिक व्हिकल 320-480 किमीचा प्रवास करू शकते. सुपरफास्ट ‘सुपरचार्जर’ स्टेशनवर एखाद्या इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरी पॅकला संपुर्ण चार्ज करण्यासाठी 50 मिनिटे लागतात. मात्र अमेरिकेत विकसित करण्यात आलेली ही नवीन बॅटरी अधिक जलद चार्ज होते.

पेन स्टेट युनिवर्सिटीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल इंजिन सेंटरचे डायरेक्टर आणि बॅटरीवर काम करणारे चाओ यांग वांग सांगतात की, 10 मिनिटांचा ट्रेंडचा भविष्य आहे व इलेक्ट्रिक वाहनांनी हे स्विकारणे गरजेचे आहे. कारण इलेक्ट्रिक व्हिकल किती किमीचा प्रवास करू शकेल, याचे उत्तर देखील यात आहे.

पेन स्टेट युनिवर्सिटीने जी बॅटरी डिझाईन केली आहे, त्यात asymmetric temperature modulation आहे. याद्वारे चार्जिंग डिव्हाईसला 10 मिनिटांसाठी 60 डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत गरम केले जाते व त्यानंतर त्वरित थंड केले जाते. याच्या मदतीने लिथियम प्लेटिंगला नुकसान न पोहचवता बॅटरी वेगाने चार्ज होते. याशिवाय प्रत्येक वेळी 10 मिनिटांसाठी 60 डिग्री सेल्सियस तापमानात गरम केल्याने बॅटरीला कोणतेही नुकसान होत नाही.

Leave a Comment