या 8 वर्षीय युट्यूबरने यावर्षी केली तब्बल 184 कोटींची कमाई

(Source)

8 वर्षीय युट्यूब रयान काजीने 2019 या वर्षात युट्यूब चॅनेलद्वारे तब्बल 26 मिलियन डॉलरची (जवळपास 184 कोटी रुपये) कमाई केली आहे. फॉर्ब्स मॅग्झिनने जाहीर केलेल्या यादीनुसार, रयान या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर आहे. फॉर्ब्सनुसार, 2018 साली देखील रयानने 22 मिलियन डॉलरची कमाई केली होती.

2015 साली रयानच्या आई-वडिलांनी रयान्स वर्ल्ड (Ryan’s World) नावाने युट्यूब चॅनेल सुरू केला होता. केवळ 4 वर्षांमध्ये या चॅनेलचे आज 22.9 मिलियन स्बस्क्राईबर्स आहेत.

रयान्स टॉईस रिव्ह्यू चॅनेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चॅनेलवर रयान खेळणी अनबॉक्स करतो व त्यांच्याशी खेळत असतो. त्याचे अनेक व्हिडीओ 1 बिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आलेले आहेत. चॅनेल सुरू झाल्यापासून आतापर्यंत 35 बिलियन व्ह्यूज या चॅनेलला मिळाले आहेत.

फॉर्ब्सच्या यादीनुसार, रयान काझीने युट्यूब चॅनेल ड्युड परफेक्टला (Dude Perfect) मागे टाकले आहे. या चॅनेलने 1 जून 2018 ते 1 जून 2019 या कालावधीमध्ये 20 मिलियन डॉलरची (जवळपास 141 कोटी रुपये) कमाई केली आहे.

या यादीत तिसऱ्या स्थानावर आणखी एक छोटी युट्यूब स्टार आहे. रशियाच्या 5 वर्षीय Anastasia Radzinskaya ने तब्बल 18 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. तिचे दोन चॅनेल “Like Nastya Vlog” आणि “Funny Stacy” यांना तब्बल 70 मिलियन स्बस्क्राईबर्स आहेत.

 

Leave a Comment