कलम 144 विषयी जाणून घ्या संपुर्ण माहिती

(Source)

सध्या देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात प्रदर्शन सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंसक प्रदर्शनाच्या देखील घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी कलम 144 लागू केले आहे. पोलिसांनी शांती व्यवस्था टिकवण्यासाठी कलम 144 लागू केले आहे. कोणत्याही शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यास कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात येते.

काय आहे कलम 144 ?

सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देत असतो. जमावबंदी लागू केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत. तसेच शस्त्र घेऊन जाण्यास देखील बंदी असते.

शिक्षा –

कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते. त्या व्यक्तीला कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत अटक करण्यात येते. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या शिक्षेसाठी जामीन मिळतो.

 काय आहे सीआरपीसी ?

सीआरपीसी म्हणजेच भारतीय दंड विधान (Code of Criminal Procedure, 1973) भारतातील गुन्ह्यांसाठी कायदे आहेत. हे 1973 ला पारित करण्यात आले व 1 एप्रिल 1974 मध्ये लागू करण्यात आले. एखाद्या गुन्ह्यात आरोपी आणि पिडितासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती सीआरपीसीमध्ये देण्यात आलेली आहे.

Leave a Comment