काँग्रेसचा 28 डिसेंबरला ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा


नवी दिल्ली – पक्षाच्या स्थापना दिनी २८ डिसेंबर ला देशभरात ‘संविधान बचाओ-भारत बचाओ’ मोर्चा काँग्रेस काढणार आहे. मोर्चांमध्ये पक्षाचे अध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख देशातील विविध राज्यांच्या राजधानींमध्ये आयोजित भाग घेतील, अशी माहिती काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांनी दिली.

भारत बचाओ रॅलीच्या यशानंतर काँग्रेसने विविध राज्यात असे मोर्चे आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या 16 डिसेंबर रोजी बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवी या दिवशी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाचा झेंडा फडकवतील. या मोर्चाचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात तीव्र विरोध नोंदवणे हाच हेतू आहे.

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांमुळे बेरोजगारी वाढली असून आर्थिक मंदी आल्याचे वेणुगोपाल म्हणाले. ब्रिटिश शासन काळात काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली होती. एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो.

आजही भारतामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. काँग्रेस पक्षाचे स्थान महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये कायम आहे.

Leave a Comment