साखरेच्या जागी या गोष्टीचा वापर केल्यास होऊ शकतो मधुमेह

(Source)

जर तुम्ही चहा-कॉफीमध्ये साखरे ऐवजी आर्टिफिशियल शुगरचे सेवन वजन कमी करणे आणि मधुमेहापासून वाचण्यासाठी करत असाल, तर तुमच्या आरोग्यावर याचा उलट परिणाम होत आहे. करंट एथेरोस्क्लेरोसिस रिपोर्टमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जे लोक कमी कॅलेरी स्वीटनरचा वापर करतात, त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक असते. हेच टाइप 2 मधुमेहाचे देखील कारण ठरू शकते.

युनिवर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाचे संशोधक पीटर क्लिफ्टन सांगतात की, मागील 20 वर्षांध्ये लहान मुलांमध्ये स्वीटनरचा वापर 200 टक्के व वयस्क लोकांमध्ये 54 टक्के वाढला आहे. जगभरात आर्टिफिशियल शुगरचा बाजार 15,600 कोटींचा आहे. कमी कॅलरी स्वीटर्नसमध्ये कॅलरी नसते, मात्र साखरेप्रमाणेच गोडवा असतो.

आधी झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये समोर आले होते की, आर्टिफिशियल स्वीटनरने वजन कमी होते. मात्र आताच्या संशोधनात याचा उलट परिणाम दिसून आला आहे. अमेरिकेत 7 वर्ष 5158 वयस्क व्यक्तींवर याचे संशोधन करण्यात आले. यामध्ये दिसून आले की, जे लोक स्वीटरनचा वापर करतात त्यांचे वजन जे याचा वापर करत नाही त्यांच्या तुलनेत अधिक वाढले आहे.

पीटर सांगतात की,  लोक स्वीटनर वापरतात व त्यांच्या आवडीच्या मिठाईचे देखील सेवन करतात. आर्टफिशियल स्वीटनर आतड्यांमधील गरजेच्या बॅक्टेरियांना बदलते. यामुळे वजन वाढते व टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment