आयफोनचे हे फिचर तुमच्या डोळ्यांसाठी अपायकारक

(Source)

अ‍ॅपल कंपनीने आपल्या आयफोन युजर्ससाठी खास नाइट मोड फीचर आणले आहे. कंपनीने आपल्या नाइट मोड फीचरला अशाप्रकारे डिझाईन केले आहे की, ज्यामुळे कमी प्रकाशात डिव्हाईसचा वापर करताना देखील डोळ्यांना आराम मिळेल. मात्र नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, आयफोनच्या या फीचरमुळे डोळ्यांना आराम मिळण्याऐवजी अधिक नुकसान पोहचवू शकते.

युनिवर्सिटी ऑफ मॅनचेस्टरच्या संशोधकांद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, दिवसा आपण पिवळ्या प्रकाशाचा अधिक सामना करतो. तर रात्री निळ्या प्रकाशाचा अधिक सामना करावा लागतो. त्यामुळे झोपताना आपल्या शरीरावर निळ्या प्रकाशाचा प्रभाव असतो.

यातून हे समजते की, नाइट शिफ्ट मोड, जे संध्याकाळच्या वेळी मंद आणि शांत प्रकाशाचा वापर करते आणि दिवसा वेगळ्या रंगाचा वापर करते. या गोष्टी उलट असणे गरजेचे आहे.

Leave a Comment