बेशुद्ध महिलेला खांद्यावर घेऊन 4 किमी चालला कॉन्स्टेबल

(Source)

आंधप्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यात एका बेशुद्ध झालेल्या महिलेला घेऊन स्पेशल पार्टी कॉन्स्टेबल 4 किमी पायी चालल्याची घटना समोर आली आहे.

माजी आमदार अकेपती रेड्डी यांच्याबरोबर मिळून अनेक लोक तिरूमाला मंदीराच्या दिशेने निघाले होते. या लोकांमध्ये असलेली एक महिला चालता चालता बेशुद्ध झाली. येथे प्रवाशांसाठी कोणत्याही गाडीची व्यवस्था नव्हती. पायी चालणे एवढाच एकमेव पर्याय येथे आहे. माजी आमदाराच्या सुरक्षेसाठी असलेले कॉन्स्टेबल कुल्याप्पा यांनी महिलेची परिस्थिती बघून तिला खांद्यावर घेतले व 4 किमी चालले.

त्यानंतर या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कॉन्स्टेबल कुल्याप्पा यांनी जे केले त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Leave a Comment