हेराच्या भूमिकेत झळकणार आयुष्मान खुराणा


आपल्या कसदार अभिनायची छाप उठविणारा बॉलीवूडचा गुणी अभिनेता आयुष्मान खुराणा आता गुप्तहेराच्या भूमिकेत लवकरच त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिंह याना या चित्रपटात भूमिका करण्यासाठी आयुष्मानने होकार दिला असून तसा करार केला असल्याचे समजते. आयुष्मान आणि अनुभव या निमित्ताने दुसऱ्या वेळी एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी अनुभव यांच्या आर्टीकल १५ मध्ये आयुष्मानने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार अनुभव यांनी त्यांच्या नव्या थ्रिलरची कथा आयुष्मानला काही दिवसापूर्वी ऐकविली होती. आता आयुष्मानने हा चित्रपट स्वीकारण्यास होकार दिला असून तसा करार केला आहे. त्यासंदर्भातली अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असे समजते. ही भूमिका जरा हटके आणि खास असेल असे संकेत मिळत आहेत. आयुष्मानने त्याच्या आगामी शुभमंगल जादा सावधान आणि गुलाबो सिताबो या चित्रपटांचे शुटींग नुकतेच पूर्ण केले आहे.यंदाच्या वर्षी त्याला अंदाधून साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार विकी कौशल सोबत विभागून मिळाला आहे.

Leave a Comment