रशियाचे अध्यक्ष पुतीन अजूनही वापरतात विंडोज एक्सपी


रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा संगणक वापरतानाचा एक फोटो नुकताच क्रेमलिन प्रेसनी रिलीज केला असून यात पुतीन त्यांच्या मास्को निवासस्थानी संगणकासमोर बसून काही काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुतीन यांच्या संगणकावर अजूनही मायक्रोसॉफ्टच्या विंडोज एक्सपीचाच वापर केला जात आहे. संगणकाच्या पिक्चर बॉटमवर दिसत असलेल्या निळ्या रंगाच्या बारवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. मायक्रोसॉफ्टने २००१ साली विंडोज एक्सपी सुरु केले होते आणि त्याची सपोर्ट सेवा २०१४ पासून बंद केली गेली आहे. त्याचे शेवटचे अपडेट २०१४ मध्येच दिले गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार रशियन सरकारी कामासाठी विदेशी सोफ्टवेअर वापरावर बंदी आहे. मात्र ज्या संगणक सिस्टीम मध्ये गोपनीयतेची गरज नाही अश्या काही मर्यादित संगणकांवर मायक्रोसॉफ्ट विंडोज १० सोफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे. पुतीन यांचा संगणक अपग्रेड केला गेलेला नाही कारण ते रशियाचे प्रमुख असल्याने सर्व टॉप सिक्रेट डॉक्यूमेंटस ते अॅक्सेस करू शकतात.

७६ वर्षीय पुतीन इमेज टेक्नोलॉजी सॅव्ही नाहीत. त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही तसेच इंटरनेटचा वापर ते क्वचितच करतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर खाते नाही. विशेष म्हणजे रशियाचे पंतप्रधान त्रीमिदी मेदवेदेव आयफोन वापरतात आणि त्यांचे इन्स्टाग्राम पेज आहे.

Leave a Comment