… म्हणून यामाहाने परत मागवल्या 7,757 बाईक्स

(Source)

यामाहा मोटर इंडियाने आपल्या दोन लोकप्रिय बाईक्स परत मागवल्या आहेत. कंपनीमे यामाहा एफझेड एफ1 आणि यामाहा FZ-S FI  या दोन बाईक्सचे 7,757 युनिट्स परत मागवले आहेत. कंपनीने सांगितले की, रिअर साइट रिफ्लेक्टरमध्ये त्रुटी असल्याने या बाईक्स परत मागवण्यात आलेल्या आहेत. या बाईक्सची निर्मिती ऑक्टोंबर 2019 मध्ये झाली होती. कंपनी या गाड्या मोफत दुरूस्त करेल.

कंपनीनुसार, परत मागवण्यात आलेल्या बाईक्सच्या रिअर साइड रिफ्लेक्टर फीट करण्यास अडचण येत आहे. कंपनीने ग्राहकांना यामाहाच्या कोणत्याही अधिकृत डिलरशिपकडे जाऊन रिफ्लेक्टर लावण्यास सांगितले आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत.

कंपनीने सांगितले की, ज्या बाईक्समध्ये त्रुटी आहेत त्या ग्राहकांना कंपनी स्वतः कॉल करेल. या दोन्ही बाईक्समध्ये बीएस6 मॉडेलचे 149 सीसीचे इंजिन देण्यात आलेले आहे.

यामाहा FZ FI ची एक्स शोरूम किंमत 99,200 रुपये आहे. तर यामाहा FZ-S FI बाईकची किंमत 1,01,200 रुपये आहे.

Leave a Comment