Video : या वजनदार व्यक्तीच्या डान्सचा फॅन झाला विल स्मिथ

(Source)

अनेकांचा असा गैरसमज असतो की, वजनदार व्यक्ती अथवा जाडे लोक डान्स करू शकत नाहीत. मात्र वेळेनुसार हा गैरसमज आता दुर होत चालला आहे. आता सोशल मीडियावर अनेक वजनदार व्यक्ती आपले डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने एका सिओन मारशिनो नावाच्या एका वजनदार व्यक्तीचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसिद्ध गायक मेगन ट्रेनरचे गाणे All About That Bass मधील कॉमिओनंतर  सिओन मारशिनो खूपच लोकप्रिय झाला होता. आता विल स्मिथने देखील त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

Go ’head @sionemaraschino!! Dust them shoes off!

A post shared by Will Smith (@willsmith) on

व्हिडीओमध्ये सिओन बॅलेटपासून ते स्ट्रिट डान्सपर्यंत सर्व प्रकारचे डान्स करत आहे.

(Source)

विल स्मिथच्या पोस्टवर ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सनने देखील कमेंट करत सिओनचे कौतूक केले.

विल स्मिथने शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत याला 70 लाखांपेक्षा अधिक व्यूज आले आहेत. नेटकरी सिओनला स्टार म्हणत आहेत व त्याच्या डान्सचे कौतूक करत आहेत.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील सिओनने अनेक डान्सचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत.

Leave a Comment