यामुळे डॉर्सी यांनी झुकेरबर्ग यांना केले अनफॉलो


सोशल मीडियात फेसबुक आणि ट्विटर या दोन दिग्गज कंपन्या असून एकाच मुद्द्यावरील दोन्ही कंपन्यांच्या सीईओंची भूमिका नेहमीच दोन टोकाची असल्याचे आपण बरेचवेळा पाहिले आहे. आता पुन्हा एकदा हे दोन्ही सीईओ चर्चेत आले आहेत. त्यामागे कारण देखील तसेच आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी अनफॉलो केले आणि पुन्हा चर्चांना उधाण आले. डॉर्सी यांनी झुकेरबर्ग यांना ज्या पद्धतीने अनफॉलो केले आहे. त्यामुळे जगभरातील सोशल मीडिया युजर्सचे लक्ष त्यांनी वेधले आहे.

डॉर्सी यांनी झुकेरबर्ग यांना अनफॉलो करण्याआधी @bigtechalert नावाच्या एका ट्विटर अकाउंटला फॉलो केले. टेक कंपन्यांचे सीईओ कोणाला फॉलो किंवा अनफॉलो करतात यावर हे ट्विटर अकाउंट नजर ठेवून असते. परिणामी जगाला झुकेरबर्ग यांना अनफॉलो केल्याचे कळावे अशीच डॉर्सी यांची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे.

@bigtechalert ला डॉर्सी यांनी फॉलो केल्यानंतर त्या अकाउंटने ट्विट करुन, @jack आता @BigTechAlert ला फॉलो करत असल्याचे ट्विट केल्यानंतर @BigTechAlert लगेचच ने ट्विट करुन “@jack आता @finkd यांना फॉलो करत नसल्याचे ट्विट केले. त्याचबरोबर यावर ट्विटरचे अधिकृत पीआर अकाउंट @twittercomms नेही तातडीने प्रतिक्रिया दिली. यामध्ये, 2012 पासून झुकेरबर्ग यांनी @finkd या अकाउंटद्वारे काहीच ट्विट केले नाही आणि त्यांच्या अकाउंटमध्ये एकूण 12 ट्विट असल्याचे म्हटले आहे. झुकेरबर्ग आपल्या टि्वटरचा वापरच करत नसल्याचा राग बहुदा डॉर्सी यांना आला असावा. कारण झुकेरबर्ग यांनी टि्वटर अकाऊंट सुरू केले खरे, पण त्यावरून त्यांनी केवळ १२ टि्वट केले आहेत.

झुकेरबर्ग यांनी सात वर्षांपूर्वी शेवटचे ट्विट केले असून आपल्या प्लॅटफॉर्मवर या दोन्ही सीईओंची अभिव्यक्ती स्वातंत्र्य , फेक न्यूज किंवा राजकीय जाहिराती यांसारख्या मुद्द्यांवर वेगवेगळी मते आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर डॉर्सी यांनी सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर बंदी घातली, तर झुकेरबर्ग यांनी याबाबत कोणतीही कारवाई अथवा पाऊल उचललेले नाही.

Leave a Comment