या ठिकाणी कैदी चालवणार ब्युटी पार्लर

(Source)

काही महिन्यांपुर्वीच केरळ येथील कारागृहांमध्ये ‘फ्रिडम फूड फॅक्ट्ररी’ नावाने एक मोहिम सुरू करण्यात आली होती. या फ्रिडम फूड फॅक्ट्रीद्वारे कैद्यांनी बनवलेली बिर्याणी, चपाती, बेकरीतील पदार्थ इत्यादी अनेक पदार्थांची विक्री केली जाते. या पदार्थांची गुणवत्ता आणि कमी शुल्लक यामुळे ते खूपच लोकप्रिय झाले होते. आता यासारख्या मोहिम केवळ कैदीच नाही तर लोकांमध्ये देखील लोकप्रिय होत आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये लवकरच कैद्यांद्वारे चालवले जाणारे पहिले ‘मेन्स ब्युटी पार्लर’ सुरू होणार आहे. पुजापुरा येथील केंद्रीय कारागृहातील कैदी या पार्लरमध्ये ब्युटिशियन म्हणून काम करतील.

या पार्लरसाठी 22 कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या कैद्यांना आधी काही प्रमाणात केस कापणे, केसांना रंग देणे, स्पा, मॅन्यूकेअर फेसिअल यासारख्या कामांचा अनुभव आहे. है कैदी शिफ्टमध्ये काम करतील.

यासाठी कारागृहाजवळीच एक बिल्डिंगचे रिनोव्हेशन करण्यात आले असून, यासाठी 9 लाख रुपये खर्च आला. या पार्लरमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या पार्लरद्वारे होणारी कमाई फंड म्हणून देण्यात येईल व या फंडचा वापर कैद्यांसाठी वेगवेगळ्या ऑनलाईन सेवा सुरू करण्यासाठी केला जाईल.

याशिवाय तिरुवअनंतपुरम, त्रिसुर, कन्नूर आणि कोझीकोडे येथे कैद्यांद्वारे चालवले जाणारे पेट्रोल पंप देखील सुरू करण्यात येणार आहे. सध्या नवीन 10 कारागृहांचे काम सुरू करण्याची योजना आहे.

Leave a Comment