या दशकात सर्वाधिक डाउनलोड झालेले हे आहेत 10 अ‍ॅप्स

(Source)

2019 हे वर्ष संपण्यास आता अवघे काही आठवडेच शिल्लक आहेत. हे दशक मोबाईल क्रांतीच आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण या एका दशकात प्रत्येकाच्या घरात, प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आला आहे आणि या स्मार्टफोनसोबतच नवनवीन अ‍ॅप्स आपल्या दैनंदिन कामाचा एक भाग झाले आहेत.

मोबाईल मार्केट डेटा आणि एनालिटिकल कंपनी अ‍ॅप एनीने या दशकात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्सची यादी जाहीर केली आहे. या अ‍ॅप्सबद्दल जाणून घेऊया.

(Source)

10. ट्विटर –

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची सुरूवात 2006 साली झाली. तेव्हापासूनच हे अ‍ॅप लोकप्रिय ठरले आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करून युजर्स 280 शब्दात आपले मत मांडू शकतात.

(Source)

9. युट्यूब –

गुगलच्या मालकीचे व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूब या दशकातील नववे सर्वाधिक डाउनलोड झालेले अ‍ॅप आहे.

(Source)

8. यूसी ब्राउजर –

अलिबाबा ग्रुपच्या मालकीचे यूसी ब्राउजर अ‍ॅप या दशकात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्सच्या यादीत 8व्या क्रमांकावर आहे. आशियातील अनेक देशांमध्ये तर यूसी ब्राउजरने गुगल क्रोमला देखील मागे टाकले आहे.

(Source)

7. टिकटॉक –

चीनी कंपनी बाइट डान्सचे मालकीचे शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉक 2017 ला चीनच्या बाहेर लाँच झाल्यानंतर खूपच लोकप्रिय ठरले.

(Source)

6. स्काइप –

टेलिकम्युनिकेशन अ‍ॅप स्काईपद्वारे व्हिडीओ कॉलिंग, चॅट सर्विस मिळते. हे अ‍ॅप या यादीत 6व्या क्रमांकावर आहे.

(Source)

5. स्नॅपचॅट –

स्नॅपचॅट हे अ‍ॅप 2011 साली लाँच झाले असून, लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप ठरले आहे.

(Source)

4. इंस्टाग्राम –

फेसबूकच्या मालकीचे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्राम हे 2010 साली लाँच झाले होते. जून 2018 ला इंस्टाग्रामचे महिन्याला 1 बिलियन एक्टिव युजर्स होते.

(Source)

3. व्हॉट्सअ‍ॅप –

आज चॅटिंगसाठी प्रत्येकजण वापरत असलेले अ‍ॅप हे व्हॉट्सअ‍ॅप आहे. फेसबुकच्या मालकीचे हे अ‍ॅप या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

(Source)

2. फेसबूक मॅसेंजर –

फेसबुकच्या मालकीचे आणखी एक अ‍ॅप फेसबूक मॅसेंजर हे या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हे अ‍ॅप 2011 साली लाँच करण्यात आले होते.

(Source)

1. फेसबूक –

या दशकात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या या अ‍ॅपमध्ये फेसबूक पहिल्या स्थानावर आहे. या दशकात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्समध्ये फेसबुकचे वर्चस्व आहे. या यादीत फेसबुकच्या मालकीचे फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम असे चार अ‍ॅप्स आहेत.

 

Leave a Comment