खडसेंची पक्षांतराबद्दल भूमिका अद्याप अस्पष्ट – नवाब मलिक


नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली असून खडसेंचे पक्षामध्ये खच्चीकरण झाले आहे. पण ते पक्षांतर करतील की नाही या बाबतची त्यांची भूमिका अजून अस्पष्ट असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

नागपुरात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर विधीमंडळाचे पहिलेच हिवाळी अधिवेशन होत आहे. विरोधकांनी दुसऱ्या दिवशीही गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे काम तहकूब करण्यात आले. यातच नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शरद पवारांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्याचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी अधिवेशन संपताच दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा या बैठकीत करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

Leave a Comment