डॉ. श्रीराम लागूंच्या निधनामुळे अपूर्ण राहिली ऋषि कपूर यांची ‘ही’ इच्छा


काल रात्री वयाच्या ९२व्या वर्षी पुण्यातील मंगेशकर रूग्णालयात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. तेव्हा त्यांना पुण्यात मंगेशकर रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. पण, त्यांच्या परिस्थिती सुधार होत नव्हता आणि काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी तसेच बॉलीवूडमध्येही पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचा केवळ मराठी इंडस्ट्रीच नाही तर बॉलीवूडलाही धक्का बसला आहे. ट्विटरद्वारे श्रीराम लागू यांना बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


श्रद्धांजली, डॉ. श्रीराम लागू सर्वात नैसर्गिक आणि सहज अभिनेय करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते. साहेब आता तुम्ही आम्हाला सोडून गेले. आपल्यासोबत मी अनेक चित्रपट केले, पण गेल्या २५ ते ३० वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. ते पुण्यात सेवानिवृत्ती जीवन जगले. लव्ह यू डॉक्टर साहेब, असे ट्विट ऋषि कपूर यांनी केले आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची ऋषि कपूर यांची इच्छा मात्र कायमची अपूर्ण राहिली आहे.


त्याचबरोबर बॉलीवूडचे अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरद्वारे खरंच एक महान थिएटर अभिनेता डॉ. श्रीराम लागू साहेब आपल्यात नाहीत ओम शांती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्दर्शक मधर भांडारकर, अशोक पंडित, राहुलदोव, ममता बॅनर्जी, प्रकाश जावडेकर, पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील श्रीराम लागूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उद्या १९ डिसेंबरला श्रीराम लागू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment