प्रियंका-निकच्या लग्नामुळे उमेद भवन पॅलेसची छप्पर फाड कमाई

2018 साली अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोन्स यांचे लग्न हे वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंट पैकी एक होते. या जोडप्याने आपल्या लग्नासाठी तुफान पैसे खर्च केला होता. या जोडप्याने मागील वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानच्या जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये विवाह केला होता.

प्रियंका आणि निकच्या या एका लग्नामुळे पॅलेसला तीन महिन्यात होणाऱ्या उत्पन्ना एवढा नफा झाला होता. याबाबतची माहिती हे पॅलेस चालवणारे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिडेटचे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर आणि मॅनेजर डायरेक्टर पुनित छतवाल यांनी दिली आहे.

पुनित छतवाल म्हणाले की, मागील वर्षी उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका चोप्राचा विवाह झाला होता. या एका विवाहामुळे आम्हाला तीन महिन्यात होणाऱ्या उत्पन्ना एवढा नफा झाला. एक विवाह हा खूप आहे.

रिपोर्टनुसार, या जोडप्याने विवाहावेळी येथे 4 दिवस पार्टी, राहणे व कार्यक्रमासाठी 4,61,000 डॉलर (जवळपास 3 कोटी 27 लाख रुपये) खर्च केले.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाचे उदाहरण देताना पुनित म्हणाले की, या सारख्या लग्नांमुळे अनेक ब्रँड्सला मोठा फायदा होतो.

काही दिवसांपुर्वीच प्रियंका आणि निकने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. याशिवाय हे जोडपे लवकरच त्यांच्या लग्नातील संगीत कार्यक्रमावरून प्रेरणा घेऊन  एक संगीत डान्स शो देखील प्रोड्यूस करणार आहेत.

Leave a Comment