एकेकाळी वर्गमित्र असलेले तिघेही आता होणार तिन्ही सैन्यदलाचे प्रमूख

(Source)

जेव्हा केबी, छोटू आणि मनोज यांनी वयाच्या 17व्या वर्षी 1976 मध्ये नॅशनल डिफेंस अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता, त्यावेळी त्यांना देखील वाटले नसेल की एके दिवशी हे बॅचमेट एकसोबत तिन्ही सैन्याचे प्रमुख असतील. तिघांचे वडिल इंडियन एअर फोर्समध्ये कार्यरत होते, एवढीच या तिघांमध्ये समानता होती. आज 44 वर्षांनी हे तिघेही आपआपल्या दलाच्या सर्वोच्च पदावर आहेत.

लेफ्टिनेंट जनरल मनोज नरवणे हे 31 डिसेंबरला जनरल बिपिन रावत यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्विकारतील. या सोबतच ते एनडीएचे त्यांचे वर्गमित्र अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्यासोबत मिळून देशातील सैन्याच्या सर्वोच्च पदावर असतील.

अ‍ॅडमिरल सिंह हे 31 मे ला देशाचे 24वे नौदल प्रमुख झाले होते. एअर चीफ मार्शल भदौरिया 30 सप्टेंबरला वायूदलाचे प्रमुख झाले होते.  लेफ्टिनेंट जनरल नरवणे या महिन्याच्या अखेरीस 28वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्विकरतील. हे तिघेही एनडीएच्या 56व्या कोर्सचा भाग होते. एनडीएमध्ये 3 वर्षांचा कोर्स पुर्ण केल्यानंतर तिघेही सर्विस अकादमीमध्ये पोहचले जेथे जून-जुलै 1980 मध्ये ऑफिसर्स म्हणून नियुक्त झाले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे की 3 कोर्समेट आपआपल्या सैन्याचे प्रमूख आहेत. कारण यासाठी जन्मतारीख, करिअरचा रेकॉर्ड, मेरिट, वरिष्ठता यासारख्या अनेक गोष्टी बघितल्या जातात.

सर्विस चीफ 62 वर्ष वयापर्यंत अथवा 3 वर्ष (जे आधी असेल ते) सेवा देतात. तर दुसरीकडे थ्री स्टार जनरल (लेफ्टिनेंट जनरल, एअर मार्शल आणि वाइस अडमिरल) 60 वर्ष वय असताना निवृत्त होतात. त्यामुळे एकाच बॅचमेटमधील तिघांनी सैन्य प्रमुख होणे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे.

लेफ्टिनेंट जनरल नरवणे आणि एअर चीफ मार्शल भदौरिया हे एनडीएमध्ये ‘लीमा’ स्क्वॉड्रनचा भाग होते तर अॅडमिरल सिंह हे ‘हंटर’ स्क्वॉड्रनचा भाग होते. याशिवाय अॅडमिरल सिंह आणि लेफ्टिनेंट जनरल नरवणे हे एनडीएमध्ये येण्याआधीपासून मित्र होते, कारण ते दोघेही काही वर्ष एकाच शाळेत शिकले होते.

Leave a Comment