नवीन वर्षात बाजारात दाखल होणार केटीएमची बहुप्रतिक्षित बाईक

(Source)

केटीएमची बहुचर्चित बाईक केटीएम 390 एडव्हेंचर नवीन वर्षात जानेवारीमध्ये लाँच होणार आहे. याआधी कंपनीच्या डिलरशीपकडे 10 ते 15 हजार रुपयांमध्ये याची बुकिंग सुरू झाली आहे. ही अधिकृत बुकिंग नसून, अधिकृत बुकिंग लाँचिंगच्या एक आठवड्यापुर्वी सुरू होईल.

केटीएम 390 एडव्हेंचरला सर्वात प्रथम EICMA 2019 मोटरसायकल शोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ही बाईक 390 ड्युकवर आधारित आहे. या बाईकमध्ये एलईडी डीआरएलसोबतच स्लिप्ट एलईडी हेडलॅम्प, एक प्लाइस्क्रीन आणि कॉम्पॅक्ट फ्यूल टॅक देण्यात आलेले आहे.

(Source)

390 एडव्हेंचर एक ऑफ –रोडिंग बाईक आहे. यामध्ये रुंद हँडलबार, नकल गार्ड्स, मेटल बेश प्लेट आणि ड्यूल पर्पज टायर मिळतील. खास गोष्ट म्हणजे यात स्पोक वायर रिंग नसेल. त्या जागी एलॉय व्हिल देण्यात आलेले आहेत. बाईकचे ग्राउंड क्लियरेंस 200एमएम आहे. त्यामुळे खराब रस्त्यावर देखील गाडीला काहीही होणार नाही.

(Source)

केटीएम 390 एडव्हेंचर एक फीचर लोडेड बाईक आहे. यामध्ये टीएफटी कलर डिस्प्ले मिळेल. ज्यात स्पीड, आरपीएम, गिअर पोजिशन इंडिकेटर, एबीएस स्टेट्स, रिअल टाइम मायलेजची माहिती मिळेल. या डिस्प्लेसोबत रायडर स्मार्टफोन देखील कनेक्ट करू शकतो.

या बाईकमध्ये 373.2 सीसी इंजिन मिळेल. हे इंजिन 43 बीएचपी पॉवर आणि 37 एनएम टॉर्क जरनेट करते. इंजिन स्लिपर क्लचसोबत 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

(Source)

ब्रेकिंगबद्दल सांगायचे तर यात फ्रंटला 320 एमएम आणि रिअरला 230 एमएम डिस्क ब्रेक आहे. बाईक ड्युअल चॅनेल एबीएसने सुसज्ज आहे. सेफ्टीसाठी यात लीन एँगल सेंसिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, स्विचेबल कॉर्नरिंग एबीएस आणि ऑफ रोड मोड सारखे फीचर्स मिळतील. या बाईकची किंमत 3.25 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment