या प्रसिद्ध गायकाच्या चष्म्यासाठी लागली 1 कोटींची बोली

(Source)

संगीताचे वेड असणाऱ्या प्रत्येकाला जॉन लेनिन हे नाव नक्कीच परिचयाचे असेल. लोकप्रिय रॉक बँड ‘द बीटल्स’चे ते सदस्य होते. आपली गाणी आणि लिरिक्समुळे जॉन आजही प्रसिद्ध आहेत.

जॉन लेनिन यांच्या चष्माच्या लिलाव करण्यात आला असून, त्यांच्या चष्म्यासाठी तब्बल 1 कोटी 8 लाख रुपयांची (1,37,500 युरो)  बोली लागली. हा चष्मा खरेदी करणाऱ्याने आपली ओळख जाहीर केली नाही.

Alan Herring ने या चष्म्याचा लिलाव केला. त्यांनी सांगितले की, मी जॉनला विचारले होते की हा चष्मा तुटला आहे, दुरूस्त करायला हवा. मात्र जॉनने हा चष्मा केवळ लूकसाठी असून, तसाच राहू दे असे सांगितले होते.

याशिवाय या लिलावात द बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसनची कॉऊबेल्सचा देखील लिलाव झाला. कॉऊबेल वाद्यासाठी 7 लाख रुपयांची बोली लागली.

Leave a Comment