असा आहे भारताचा सर्वात शक्तिशाली हेरगिरी उपग्रह

(Source)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था –इस्रोने 11 डिसेंबरला भारताचे सर्वात ताकदवर हेरगिरी उपग्रह रिसॅट-2बीआर1 चे प्रक्षेपण केले. 21 मिनिटात हा उपग्रह अंतराळात स्थापित झाला. हा उपग्रह इमेजिंगसाठी तयार आहे.

रिसॅट-2बीआर1 उपग्रह भारताच्या सुरक्षा आणि विकासासाठी महत्त्वपुर्ण आहे. हा उपग्रह अंतराळात 576 किमी उंचीवरून देशांच्या सीमेवर लक्ष ठेवेल. हे 75 वे लाँच व्हिकल मिशन होते. पीएसएलव्हीचे हे 50 वे मिशन होते. तर दुसरे PSLV-QL रॉकेटचे उड्डाण होते.

(Source)

PSLV-C48QL रॉकेटच का निवडले ?

PSLV-C48QL रॉकेटमध्ये चार स्ट्रॅप ऑन्स असतात. यामुळे त्याला क्यूएल म्हणतात. हे या रॉकेटचे दुसरे लाँचिंग होते. लाँचिंगच्या 21 मिनिटातच रॉकेटने सर्व 10 उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षेत स्थापित केले.

(Source)

कसे काम करेल RiSAT-2BR1?

RiSAT-2BR1 दिवस-रात्र अशा दोन्ही वेळी काम करेल. कोणत्याही वातावरणात फोटो काढण्यास सक्षम आहे. हे मायक्रोवेव फ्रिक्वेंसीवर काम करणारे सेटेलाईट आहे. त्यामुळे याला रडार इमेजिंग सेटेलाईट म्हणतात. हे रिसॅट-2 सेटेलाईटचे आधुनिक व्हर्जन आहे. या द्वारे काढण्यात आलेले फोटो कॅमेऱ्यात काढण्यात आलेल्या फोटोसारखे नसतील. देशाच्या सैन्याबरोबरच हे कृषि, जंगल आणि आपत्ती व्यवस्थान विभागाला देखील मदत करेल.

(Source)

इस्रोने पीएसएलव्ही-सी48 क्यूएल रॉकेटद्वारे रिसॅट-2बीएचआर1 उपग्रह तर लाँच केलाच. त्याशिवाय अमेरिकेचे 6, इस्त्रायल, जापान आणि इटलीचे एक-एक सेटेलाइटचे देखील प्रक्षेपण करण्यात आले.

मुंबईतील 26/11 हल्ल्यानंतर रिसॅट सेटेलाईटमध्ये बदल करण्यात आलेले आहे. हल्ल्यानंतर सीमांवर सेटेलाईटद्वारे लक्ष दिले जाते.

Leave a Comment