आंदोलनादरम्यान शीख बंधुंच्या या कृत्याने जिंकली सर्वांचीच मने

(Source)

देशभरात नागरकित्व कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया युनिवर्सिटीच्या विद्यार्थी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाली, बस पेटवण्यात आल्या. या घटनेनंतर पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला. या घटनेनंतर तर देशभरात अनेक ठिकाणी, युनिवर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली.

या कायद्याच्या विरोधात इंडिया गेटवर देखील आंदोलनकर्ते जमले. मात्र यावेळी काही शीख बंधुंनी मानवता दाखवत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत सर्वांना चहा पाजला.

एका ट्विटर युजरने 15 सेंकदाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, म्हणून आपण सिंग इज किंग म्हणतो. या शीख बंधुनी इंडिया गेटवर आंदोलनकर्त्यांसाठी चहाची सोय केली होती. हे खरे हिरो आहेत.

खालसा एडचे संस्थापक रविंद्र सिंह हे देखील ट्विट करत म्हणाले की, दिल्ली आणि भारतातील शिखांनो, ज्या विद्यार्थ्यांना जेवायला मिळत नाहीये, अशांसाठी गुरूद्वाराची दारे उघडा.

नेटकऱ्यांनी देखील या शीख बंधुंचे कौतूक केले.

Leave a Comment