या तळीरामाने नशेत चालवली चक्क विना टायरची कार

(Source)

काही लोक गाडी चालवताना वाहतूक नियमांना फाट्यावर मारत असतात. इंग्लडमध्ये पोलिसांनी अशाच प्रकारे दारू पिऊन गाडी चालवत असलेल्या चालकाला अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चालकाने एवढी दारू पिली होती की, तो विना टायरची गाडी चालवत आहे हे देखील त्याच्या लक्षात आले नाही.

इंग्लंडच्या साउथ यॉर्कशायर पोलिसांनी रोथरहॅम येथून ही गाडी जप्त केली. गाडीचे फोटो शेअर करताना पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, चालकाने गाडीचा विमा काढला नव्हता व त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हते.

पोलिसांनी ट्विट केले की, रात्री ही गाडी जप्त करण्यात आली. या गाडीच्या ड्रायव्हर रद्द झालेले लायसन्स, विमा न काढणे, आरटीसी आणि न्यायालयात सादर झाल्याची माहिती न दिल्याबद्दल अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढे लिहिले की, ड्रायव्हर एवढा नशेत होता की त्याला गाडीचा पुढील टायर गायब आहे हे देखील लक्षात आले नाही.

पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसू शकते की गाडीचा पुढील टायर गायब आहे. इंग्लंडमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यास सहा महिन्यांचा कारावास, एक वर्ष ड्रायव्हिंगवर बंदी आणि दंड अशी शिक्षा होते.

Leave a Comment