यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहिर


नवी दिल्लीः यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. २०१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा साहित्य अकादमीने बुधवारी केली. २३ भाषांसाठी हे पुरस्कार त्यात घोषित करण्यात आले.

त्यात सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा समावेश आहे. यात यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार मराठीतून ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला घोषित करण्यात आला. अनुराधा पाटील गेल्या ४५ वर्षांपासून निष्ठेने आणि चिंतनपूर्णतेने काव्यलेखन करीत आहेत. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. या पुरस्कारामुळे आपल्याला आनंद झाला असून आजवर निष्ठेने लिहित आलेल्या कवितेचा तो सन्मान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Leave a Comment