हॉलीवूड अॅनिमेशन फिल्म फ्रोझन टूची छप्परफाड कमाई


हॉलीवूड अॅनिमेशन फिल्म फ्रोझन टू ने भारतात तुफान व्यवसाय केला असून अॅनिमेशन फिल्म विभागात कमी काळात सर्वाधिक कमाई करण्याचे रेकॉर्ड तिने नोंदविले आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन साठी प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांनी आवाज दिला आहे. विशेष म्हणजे प्रियांका आणि परिणीती यांनी प्रथमच फिल्म प्रोजेक्टसाठी एकत्र काम केले आहे. २२ नोव्हेंबर रोजी ही फिल्म रिलीज झाल्यावर पहिल्याच आठवड्यात तिने साडेतीन कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात ही कमाई ११ कोटींवर गेली होती तर १६ डिसेंबरपर्यंत ४२.५२ कोटींची कमाई या चित्रपटाने नोंदविली आहे. या पूर्वी हे रेकॉर्ड इनक्रेडीबल्स २ चे होते त्यांनी ४१.६५ कोटींची कमाई केली होती.

फ्रोझन टू इंग्रजीबरोबर हिंदी, तमिळ आणि तेलगु भाषेत रिलीज केला गेला आहे. या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड केले असले तरी वर्षातील सर्वात यशस्वी अॅनिमेशन चित्रपट ठरला द लायन किंग. या चित्रपटाने १५०.०९ कोटींची कमाई करून भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळविले होते.

Leave a Comment