येथे भगवती देवीचे वाहन आहे बैल


भारतात देवीची अनेक मंदिरे आहेत. मात्र बहुसंख्य ठिकाणी दुर्गा सिहांरूढ रुपात पाहायला मिळते. उत्तराखंड मधील पानौरा या एका नितांत सुंदर छोट्याश्या गावात मात्र भगवती माता बैलावर आरूढ आहे. म्हणजे येथे तिचे वाहन बैल आहे. हे अदभूत मंदिर आदिकाळातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर शरयू काठी आहे. या मंदिरात देवीची पूजा आदिशक्ती स्वरूपातच केली जाते. या मंदिराच्या परिसरात सरस्वती आणि लक्ष्मी माता मंदिरेही आहेत.

या ठिकाणी दर वर्षी चैत्री आणि अश्विन मासात नवरात्रीत मोठी यात्रा भरते आणि देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिरात देवीचा सेवक नागराज वासुकी आहे आणि तो रोज रात्री देवीच्या दर्शनाला येतो असा भाविकांच्या विश्वास आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गावावर देवीची कृपा आहे आणि तिच्या कृपेनेच येथे दरवर्षी मुबलक पिक येते. पूर्वी हे मंदिर छोटे होते मात्र स्थानिकांनी स्वतः पैसे खर्च करून मोठे मंदिर बांधले आहे.

Leave a Comment