भारतीय हवाई दलाला मिळाले ब्राह्मोस


भारतीय हवाई दलाला मंगळावरी अचूक मारा करणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र मिळाले असून त्यामुळे आता हवाई दल जमीन किंवा समुद्रात असलेल्या शत्रूच्या कोणत्याही मोठ्या ठाण्यावर ३०० किमी अंतरावरून हल्ला करून ही ठाणी नष्ट करू शकणार आहेत. ओरिसाच्या तटावर सुखोई एमके ३० लढाऊ विमानाने हवेतून हे मिसाईल समुद्रातील नियोजित टार्गेटवर यशस्वीरित्या डागले . या मिसाईलचे सर्व टप्पे यशस्वीपणे पार पाडून सुखोईने या मिसाईलचा अचूक वार केला.

ब्रह्मोसमुळे भारतीय सेनेला अधिक बळ मिळाले असून हे मिसाईल ताकदवान आहेच पण ते अतिशय अचूक वेध घेणारे आहे. लष्कर आणि नौसेना तसेच हवाई दलाकडे हे मिसाईल अगोदरपासून आहे मात्र आता ते हवाई दलाच्या सर्वात उत्तम दर्जाच्या फायटर जेटवर बसविले जात आहे. भारत रशिया सहकार्यातून हे मिसाईल बनविले गेले आहे.

या मिसाईलचे वजन २.५ टन आहे आणि त्याची रेंज ३०० किमी आहे. सुखोई लढाऊ विमाने भारतीय हद्दीतून शत्रूच्या ३०० किमी अंतरावरील कॅम्पवर ही मिसाईल डागू शकणार आहेत. वायुसेनेने सर्वप्रथम २२ नोव्हेंबर २०१७ ला या मिसाईलची चाचणी समुद्रातील टार्गेट जहाजावर घेतली होती ती यशस्वी झाली होती. त्यानंतर २२ मे २०१९ रोजी जमिनीवरील टार्गेटवर ही चाचणी घेतली गेली आणि त्यानंतर पुन्हा समुद्रातील टार्गेटवर १७ डिसेंबर २०१९ ला पुन्हा चाचणी घेतली गेली. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

Leave a Comment