चांद्रयान ३ टीम मध्ये एम वनिता यांचा समावेश नाही


इस्रोच्या चांद्रयान २ मिशनमधील प्रोजेक्ट डायरेक्टर वैज्ञानिक एम वनिता या चांद्रयान तीन मोहिमेचा हिस्सा असणार नाहीत असे समजते. मात्र चांद्रयान दोन मोहिमेतील टीम लीडर रितू करिधाल चांद्रयान तीन मोहिमेत सहभागी होणार आहेत. इस्रो मुख्यालयाने एम वनिता यांच्याजागी पी. वीरामुतुवेल यांची प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नेमणूक केली असून एम वनिता यांच्याकडे आता पेलोड, डेटा मॅनेजमेंट अँड स्पेस अॅस्ट्रोलॉजी एरियाच्या उपसंचालक पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे असे समजते.

चांद्रयान दोन मोहिमीची जबाबदारी एम वनिता आणि रितू करीधाल या दोन महिलांच्या हाती दिल्याने इस्रोचे विशेष कौतुक केले गेले होते. मात्र चांद्रयान दोन मोहिमेत विक्रम लँडर चंद्रावर यशस्वी उतरू शकले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार या मिशन मध्ये चांद्रयान दोनच्या सर्व सिस्टीमसाठी एम विनिता यांच्याकडे जबाबदारी होती. एम वनिता यांची बदली का केली गेली याचे कोणतेही कारण दिले गेलेले नही.

चांद्रयान तीन मोहिमेसाठी २९ उप प्रोजेक्ट डायरेक्टर नियुक्त केले गेले असून त्यांच्यापैकी काहींकडे लँडर तर काहींकडे रोव्हरची जबाबदारी दिली गेली आहे.

Leave a Comment