व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी आणले हे तीन खास फीचर

(Source)

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी खास तीन नवीन फीचर आणले आहेत. या नवीन अपडेटमध्ये ग्रुपमध्ये अ‍ॅड होणे, रिमाइंडर आणि कॉल वेटिंग हे तीन खास फीचर देण्यात आलेले आहेत.

ग्रुप इनवाइट फीचर –

जर तुम्ही ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यास वैतागले असाल तर व्हॉट्सअ‍ॅपने एक खास फीचर आणले आहे, ज्यामुळे तुम्हाला न विचारता कोणीही ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये अ‍ॅड करायचे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन Everyone, my contacts आणि my contacts except या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता.

रिमाइंडर फीचर –

व्हॉट्सअ‍ॅपवर आता तुम्हाला रिमाइंडरचे देखील फीचर मिळणार आहे. या नवीन टूलद्वारे तुम्ही टास्क तयार करू शकता व तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर रिमाइंडर मिळेल. मात्र यासाठी युजर्सला Any.do डाउनलोड करावे लागेल. हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपशी कनेक्ट करावे लागेल. हे फीचर मोफत नसून, यासाठी तुम्हाला Any.do वर स्बस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

कॉल वेटिंग फीचर –

हे फीचर आल्यानंतर युजर्सचे कोणतेही कॉल मिस होणार नाहीत. आता व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग दरम्यान युजर्सला कॉल वेटिंगचे नॉटिफिकेशन मिळेल. आता व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलत असताना व्हॉट्अ‍ॅपवर दुसरा कॉल आल्यास युजर्सला तो रिसिव्ह अथवा कट करण्याचा पर्याय असेल.

 

Leave a Comment