अमेरिकन गुंतवणुकदारांची भारतीयांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

(Source)

अमेरिकेतील भारतीय वंशांच्या दोन नागरिकांच्या मालकीची स्टार्टअप कंपनी रिव्हरसँडमध्ये अमेरिकन गुंतवणूकदार क्रेस्टलाईन इन्वेस्टर्सने 1 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

रिव्हरसँड कंपनीने सॉफ्टवेअर सेवा, मास्टर डेटा मॅनेजमेंट आणि प्रोडक्ट इंफॉर्मेशन मॅनेजमेंट क्षेत्रात 3.5 कोटी डॉलर जमा केले आहेत. कंपनीचे सीईओ उपेन यांनी सांगितले की, क्रेस्टलाइन इन्वेस्टर्च एक चांगले भागीदार आहेत व त्यामुळे या क्षेत्रात सर्वोत्तम उत्पादन देण्यासाठी आम्हाला मदत होईल.

त्यांनी सांगितले की, या गुंतवणूकीचा वापर उत्पादनांना अधिक चांगले करण्यासाठी केला जाईल. विश्लेषकांनुसार, डेटा मॅनेजमेंटचा बाजार वेगाने वाढत आहे. कारण कंपन्यांना व्यापारच्या यशासाठी डेटाची गरज असल्याचे लक्षात आले आहे. क्रेस्टलाइनचे व्यवस्थापक संचालक विल पामर यांनी देखील भारतीय वंशांच्या या स्टार्टअपला विश्वस्तरीय म्हटले आहे.

Leave a Comment