हिंदीसह आणखी दोन भाषेत रिलीज होणार ‘स्ट्रीट डान्सर’


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ हा चित्रपट येणार असून ‘एबीसीडी’ सिरीजचा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा हे करत आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदीसह हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.


भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यांच्या लूकवरून या चित्रपटात डान्सची जबरदस्त स्पर्धा रंगणार असल्याचा अंदाज येतो. उद्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 24 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment