‘तुमची आयटी सेल खरी तुकडे तुकडे गँग’ असल्याचे रेणूका शहाणेचे मोदींसाठी ट्विट


ईशान्य भारतातून नागरिकत्व कायद्याविरूद्ध सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशभरात उमटायला सुरूवात झाली आहे. दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींचादेखील यामध्ये समावेश आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला रिप्लाय देताना अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी देखील भाजप आयटी सेल खरी तुकडे तुकडे गँग असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तणावाची स्थिती पाहता अफवांवर विश्वास न ठेवता आपले बंधुत्त्व कायम ठेवत शांततेचे आवाहन केले आहे. रेणूका शहाणे यांनी पंतप्रधानांच्या या ट्विटला रिप्लाय करताना भाजपवर अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे.


तुमच्या आयटीसेलच्या माध्यमातून अफवा, चूकीच्या बातम्या आणि बंधुत्त्व, शांततेला तडा जाणारी ट्विट्स केली जात आहेत. तुमची आयटी सेल ‘तुकडे तुकडे गॅंग’ असल्याचे म्हणत रेणूका शहाणे यांनी भाजपवर टीका केली आहे.

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात 6 वर्षे वास्तव्य केल्यास सोबत त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसली, तरी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे थेट भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. ईशान्य भारतातून प्रामुख्याने सध्या या कायद्याविरूद्ध विरोध केला जात आहे.

Leave a Comment