रिअलमीचा 64 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतात लाँच

(Source)

स्मार्टफोन कंपनी रिअलमीने आपला नवीन स्मार्टफोन रिअलमी एक्स2 भारतात लाँच केला आहे. हा फोन सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 जी प्रोसेसर, 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आणि 30 वॉल्ट प्लॅश चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आलेली आहे.

या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल सांगायचे तर 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. 6जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि 8जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. 20 डिसेंबरपासून या फोनची विक्री सुरू होईल.

(Source)

ड्युअल सिम सपोर्ट हा स्मार्टफोन अँड्राईड 9 पायवर बेस्ड ColorOS 6 चालतो. यात वॉटरड्रॉप नॉचसोबत 6.4 इंच फूल एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग ग्लास 5 चे प्रोटेक्शन मिळेल. रिअलमी एक्स2 मध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर मिळेल.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर रिअलमी एक्स2 स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइट अँग्ल कॅमेरा आणि दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. व्हिडीओग्राफीसाठी यात फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यामध्ये EIS (इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन) फीचर सपोर्ट मिळेल.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G एलटीई, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, USB टाइप-C, आणि 3.5mm जॅक सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W VOOC 4.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सपोर्ट करते. 30 मिनिटात हा फोन 67 टक्के चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment