परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा


लाहोर : पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा शिक्षा सुनावली आहे. सोमवारी लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला नोटिस पाठवली होती. उच्च न्यायालयात मुशर्रफ यांनी त्यांची याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असवैधानिक असल्याचे जाहीर करावे अशी मागणी केली होती. त्यावर इस्लामाबादच्या विशेष न्यायालायत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय देण्यात आला.

देशद्रोहाचा खटल्याचा निर्णय तीन सदस्यीय विशेष न्यायालयात देण्यात आला. उच्च न्यायालयाने याआधी विशेष न्यायालयाला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय गेल्या महिन्यात राखून ठेवला होता. मुशर्रफ गेल्या दोन वर्षांपासून दुबईत वास्तव्य करत आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला संविधानाचा भंग केल्या प्रकरणी आणि 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्या प्रकरणी दाखल कऱण्यात आला होता. सध्या 76 वर्षांचे असलेले मुशर्रफ दुबईत उपचार घेत आहेत. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता.

Leave a Comment