‘बंटी और बबली’च्या सिक्वेलमध्ये झळकणार नवी जोडी


२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटाचा सिक्वेल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बंटी आणि बबलीच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी यांच्या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात मुख्य भूमिका असतील.


अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी यांच्या आदित्य चोप्राने निर्माण केलेल्या ‘बंटी और बबली’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. बंटी और बबलीमधील अलिशा चिनॉयने म्हटलेले व ऐश्वर्या रायने नाच केलेले ‘कजरा रे’ हे गाणे २००५ मधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.

वरुण शर्मा ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वरुण शर्मा यांनी सुल्तान आणि टायगर जिंदा है या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले होते. आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या आदित्य ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली आहे.

Leave a Comment