नथुराम गोडसेचे मेरठ जिल्ह्याला मिळणार नाव?


मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या राजस्व विभागाने मेरठ हे नाव बदलून ते पंडित नथुराम गोडसे करण्यात यावे म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांचे या विषयासंबंधी म्हणणे मागावले आहे. त्याचप्रमाणे गाझियाबाद आणि मुझफ्फरनगरचेही नामाकरण करण्याबाबतचे प्रस्ताव पुढे आले आहे. तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांचे सतत होणाऱ्या नामाकरणाच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासाठी म्हणणे मागविण्यात आले आहेत.

पाठवलेल्या पत्रानुसार, हापूडचे नाव महंत अवैद्यनाथ नगर आणि गाझियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर असे करण्याची मागणी होत आहे. याबाबतचे राजस्व विभागाने जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. हापूड जिल्हा प्रशासनाने गुरुअवैद्यानाथ यांच्या नावाने जिल्ह्याचे नाव बदलण्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विनंती नाकारली आहे. तसेच मुझफ्फरनगरसाठी कोणत्या नावाची मागणी केली गेली आहे हे पत्रात नमूद करण्यात आलेले नाही.

गेल्या चार महिन्यांत तीन जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. लवकरात लवकर या प्रकरणी राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हणणे आहे. हा निर्णय जर घेतला नाही तर हे मुद्दे धुळ खात पडून राहतील असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

मेरठमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचा एक भाग असल्याचा दावा एका संघटनेने १ नोव्हेंबर रोजी केला होता. मेरठचे पंडित नथुराम गोडसे हे नामकरण करण्याची मागणी त्याच संघटनेने केली होती. पण हा मुद्दा कधीही उपस्थित केल्या नसल्याचे या संस्थेच्या अध्यक्षाचे म्हणणे आहे.

Leave a Comment