असे आहेत आपले नवे मराठमोळे लष्कर प्रमुख

(Source)

लेफ्टनंट जनरल मनोज मुकूंद नरवणे हे नवे लष्करप्रमुख असतील. 31 डिसेंबरला जनरल बिपिन रावत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर लेफ्टिनेंट जनरल हे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्विकारतील.

(Source)

नरवणे यांचे शालेय शिक्षण हे पुण्यातील ज्ञानप्रबोधनी शाळेतून झाले आहे. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे आणि भारतीय सैन्य अकादमी, देहरादूनचे विद्यार्थी आहे. त्यांनी मद्रास युनिवर्सिटीमधून संरक्षणात मास्टर डिग्री आणि देवी अहिल्या युनिवर्सिटीमधून संरक्षण आणि व्यवस्थापनात एमफील केले आहे.

(Source)

नरवणे यांनी 1 डिसेंबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 पर्यंत जनरल ऑफिसर कमांडिग इन चीफ, आर्मी ट्रेनिंग कमांड म्हणून कार्य केले. त्यांच्याकडे काश्मिर आणि पुर्वांचल भारतात काउंटर-इंसर्जेंसी ऑपरेशन्सचा अनुभव आहे. त्यांनी जम्मू-काश्मिरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि इनफ्रेंटी ब्रिगेटचे देखील नेतृत्व केले आहे.

(Source)

नरवणे श्रीलंकेतील शांती मिशन दलाचा देखील भाग होते. म्यानमारमधील भारतीय दुतावासात देखील ते कार्यरत होते. याशिवाय 2017 साली प्रजासत्ताक दिनाचा परेडचे ते कमांडर देखील होते.

(Source)

त्यांना जून 1980 मध्ये शीख लाइट इंफ्रेंटी रेजीमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये कमिशन मिळाले होते. जम्मू-काश्मिरमध्ये आपल्या बटालियनचे प्रभावीपणे नेतृत्व करण्यासाठी त्यांना सैन्यपदक देखील मिळालेले आहे.

(Source)

त्यांनी नागालँडमध्ये आसाम रायफल्सच्या (उत्तर) महानिरीक्षक म्हणून केलेल्या कामासाठी त्यांना ‘विशिष्ट सेवा मेडल’ मिळालेले आहे. प्रतिष्ठित स्ट्राइक कोरचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’ मिळालेले आहे. त्यांना ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ देऊन गौरविण्यात आले आहे.

Leave a Comment