भारताच्या या भिंतीपुढे चीनची भिंत पानी कम चाय

(Source)

‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ अर्थात चीनची जगप्रसिद्ध भिंत आपल्या लांबी व मजबूतीसाठी जगभरात ओळखली जाते. मात्र तुम्हाला जगातील दुसरी सर्वात लांब भिंत कोठे आहे माहिती आहे?

तुम्हाला राजस्थानमधील कुंभलगढ किल्ल्याबद्दल माहिती आहे का ? राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ल्याची भिंत चीनच्या भिंतीनंतर जगातील दुसरी सर्वात लांब व मजबूत भिंत आहे. ही भिंत जवळपास 36 किमी लांब आहे. सम्राट अकबराला देखील ही भिंत पाडणे शक्य झाले नव्हते.

(Source)

9 मे 1540 ला महाराणा प्रताप यांचा जन्म या किल्ल्यावर झाला. कुंभलगढ संकटात मेवाडची राजधानी देखील होते. या किल्ल्यावर अनेकवर्ष राजपूतांचे राज्य होते. हा किल्ला उदयपूरपासून 82 किमी लांब अरवली पर्वतरांगेमध्ये आहे.

1443 मध्ये राणा कुंभा यांनी या किल्ल्याची निर्मिती सुरू केली. यावेळी सुरक्षेसाठी उपाय म्हणून किल्ल्याच्या चारही बाजूला भिंत बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र जेव्हा या भितींचे काम सुरू झाले तेव्हा ते अखंड सुरूच राहिले. अखेर देवीला एका संताची बळी दिल्यानंतर भितींचे कार्य पुर्ण झाले. या भितींला भारतातील महान भिंत असेही म्हटले जाते. ही भिंत 15 मीटर रुंद आहे.

(Source)

कुंभलगढ किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 7 दरवाजे आहेत. ज्यात रामद्वार, पग्र द्वार, हनुमान द्वार इत्याती प्रसिद्ध आहेत. या किल्ल्यात 360 मंदिरे आहेत. ज्यातील 300 जैन व 60 हिंदू मंदिरे आहेत. यातील नीलकंठ महादेवाच्या मंदिराला इतरांपेक्षा अधिक महत्त्व आहे.

(Source)

रात्रीच्या वेळी या किल्ल्याच्या चारही बाजूला मशाली पेटलेल्या असतात. ज्यामुळे संपुर्ण भिंत प्रकाशमय होते. येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात.

(Source)

या किल्ल्याच्या चारही बाजूला भलेही तुम्हाला वाळवंट दिसत असेल. मात्र ही भिंत आजही मजबूतीने उभी आहे. शेकडो वर्षानंतर देखील या भिंतीला आजही काहीही झालेले नाही. या भिंतीला कुंभलगढाची सिटी वॉल देखील म्हटले जाते.

या किल्ल्याला काही वर्षांपुर्वीच यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालेले आहे. हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान म्हणजेच राजस्थानच्या पर्वतांवरील 6 किल्ल्यांपैकी कुंभलगढ किल्ला देखील एक आहे.

 

Leave a Comment